" कैकाडी समाजातील  नागरीकांचे सामाजिक, शैक्षिणीक व राजकीय हक्‍क मिळविणेसाठी समाजातील सर्वांना सोबत घेऊन कैकाडी समाजाचा संर्वांगीण विकास करणेसाठी आवश्‍यक कार्य करुन एक सशक्‍त समाज निर्माण करण्‍यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे "
शिका - संघटीत व्‍हा - संघर्ष करा
लालासाहेब जाधव
अध्‍यक्ष

कैकाडी समाजाबद्दल माहीती

महाराष्‍ट्र राज्‍यातील कैकाडी जातीबद्दल सध्‍याच्‍या काळात काही साहीत्‍यकारांनी बरेच लिखाण केले आहे. इसवी सन पूर्व सातव्‍या सहस्‍त्रकात आर्य, कझाकस्‍थान, मंगोलिया, सायबेरीया या प्रांतातून स्‍थलांतरीत होऊन हा समाज महेरगढ परीसरात आला असल्‍याचे ऐतिहासिक पुरावे संशोधनात मिळाले आहेत. आर्यांनी क्षत्रिय लोकांमध्‍ये जातिभेद निर्माण करुन कैकाडी जातीचा जन्‍म झाला. काही क्षत्रिय जंगलात द-याखो-यात राहून आपली उपजिविका करु लागले. टोळीटोळीने जंगलात भटकंती करु लागले. त्‍यांची वेगवेगळी सांकेतिक भाषा तयार झाली. त्‍यातूनच कैकाडी जातीचा जन्‍म झाला. कैकाडी समाजातील लोक उपजिविकेचे साधन शोधायला लागली. ” कै म्‍हणजे हात काडी म्‍हणजे झाडाच्‍या फांदया यापासून विणकाम करणारे कैकाडी असे त्‍यांच्‍या उपजिविकेच्‍या कामावरुन समाजाचे नाव “कैकाडी” असे संबोधण्‍यात येऊ लागले ”. जंगालातील लहान झाडाच्‍या बारीक फांदया गोळा करुन त्‍यापासून पाटया, टोपली हाताने विणकाम करणारा समाज म्‍हणजेच कैकाडी समाज होय. असा कैकाडी समाज संपूर्ण भारतामध्‍ये वेगवेगळया नावाने ओळखला जातो. महाराष्‍ट्रातील कैकाडी व त्‍यांच्‍या एकुण पाच उपजाती आहेत. १. गाव कैकाडी २. कोरवी/कोरवा ३. धोंतले ४. कोंचीकोरवा (माकडवाले) ५. पामलोर या कैकाडी समाजातील मुख्‍य उपजाती आहेत.

कैकाडी समाजात सातपाडी व कावाडी या दोन मुख्‍य कुळी आहेत. बेटी व्‍यवहार सातपाडी व कावाडी या दोन कुळी मध्‍ये होतात. आपआपल्‍या कुळात बेटी व्‍यवहार होत नाहीत. सातपाडी कुळात जन्‍म घेतलेली मुलगी कावाडी कुळात दिली जाते. व कावाडी कुळात जन्‍मलेली मुलगी सातपाडी कुळात दिली जाते, यामुळे कैकाडी समाजात अजूनही पवित्र बंधने पाळली जातात. त्‍यामुळे समाजात प्रेमभाव, बंधूप्रेम, सोयरे व आपलेपणा टिकून आहे. कैकाडी समाजाची बाेलीभाषा वेगळी आहे. या भाषेत प्रत्‍येक जिल्‍हयात थोडा फार फरक जाणवतो. त्‍या भाषेत तेलगू, कन्‍नड, केरळा व तमिळ असे मिश्र भाषेचा संगम आहे. या भाषेला लि‍पी नाही. म्‍हणूनच तिला बाेली भाषा म्‍हणतात. प्रत्‍येक जिल्‍हयात भाषा एकच पण उच्‍चार वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी तेलगू भाषेचा प्रभाव तर काही ठीकाणी कन्‍नड भाषेचा प्रभाव दिसून येतो.  कैकाडी समाजाचा मुळ व्‍यवसाय विणकाम करणे हा आहे. विणकामासाठी, शिंदीचे फोक, बाबू ,निनगुडी, पिंचुडी, कापसाचे , टणटणीचे फोक, कावळीचे फोक याच्‍यापासून पाटया – टोपली, कणगी, खुराडी, झाप, कुडके-कुडवे, कुरकुली, उपण्‍या इत्‍यादी बनविले जातात. या सर्व वस्‍तू शेतकरी वर्गाला उपयोगी असतात. या वस्‍तू शेतकरी यांना देऊन त्‍याच्‍या मोबदल्‍यात धान्‍य देत असत. तर काहीजण पैसे देत असत. सध्‍या वरील वस्‍तू या प्‍लास्टिक स्‍वरुपात मिळत असल्‍याने कैकाडी समाजाचा पीढीजात व्‍यवसाय कमी झाला आहे. विणलेली टोपली व इतर साहीत्‍य विकण्‍यासाठी समाजातील लोकांचे गावांचे व्‍यवसायसाठी वाटप केली जात असे. पूर्वीचा पांरपारीक व्‍यवसाय सध्‍याच्‍या आधुनिक युगात बदल होऊन कैकाडी समाजातील काही लोकांनी शिक्षण घेऊन  विविध क्षेत्रामध्‍ये नवनविन व्‍यवसाय, शेती, नोकरी करीत आहेत. परंतु कैकाडी समाजातील बहुतांश समाज हा अशिक्षीत असून समाज सुधारणा घडवून आणणे व समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास करण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. हे आव्‍हान कैकाडी समाज संघ पार पाडण्‍यासाठी कसोशीने प्रयत्‍न करीता आहे.

—- लेखक श्री. लालासाहेब नामदेव जाधव, संस्‍थापक अध्‍यक्ष, कैकाडी समाज संघ, महाराष्‍ट्र राज्‍य

महत्‍वाचे उदीष्‍टे

सामाजिक

कैकाडी समाजातील सर्व नागरीकांना सामाजिक हक्‍काची जाणीव करुन देणे. समाजामध्‍ये कैकाडी समाजातील प्रत्‍येक व्‍यक्‍तींचा सन्‍मान व प्रतिष्‍ठा निर्माण करुन समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात सामील करुन घेणे व त्‍यांचा सर्वांगीण सामाजिक विकास करणेसाठी काम करणे, कौकाडी समाजासाठी सामाजिक आरक्षण मिळविणेसाठी प्रयत्‍न करणे , राजकीय प्रतिनिधीत्‍व निर्माण करणेसाठी प्रयत्‍न करणे, कैकाडी समा‍जातील नागरीकांमध्‍ये एकता, समजा व बंधुता निर्माण करुन एकसंघ प्रतिष्ठित समाज घडविणेसाठी सर्वांच्‍या सहकार्याने कामे करणे

सांस्‍कृतिक

कैकाडी समाजातील मुले - मुलींमध्‍ये कला व क्रीडा विषयक गुण मोठया प्रमाणात आढळून येतात पंरतु त्‍यांना योग्‍य प्रशिक्षण व व्‍यासपीठ उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे समाजातील लोक कला व क्रीडा क्षेत्रामध्‍ये आपला नावलैकीक मिळविण्‍यासाठी खूप अडचणीला सामोरे जावे लागते. त्‍यामुळे कैकाडी समाज संघ मार्फत कैकाडी समाजातील नागरीकांना कला व क्रीडा क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणे साठी प्रोत्‍सहानपर कार्यक्रम आयोजित करणे. खेळाडू व कलावंताना प्रशिक्षण देणे

शैक्षणिक

कौकाडी समाजामध्‍ये खुप मोठया प्रमाणात शैक्षणिक मागासलेपणा आहे. समाजातील लोक शिक्षणाबद्दल जागरु नसल्‍याने समाज शैक्षणिक दृष्‍टया इतर समाजाच्‍या तुलनेत खुप मागे आहे. त्‍यामुळे कैकाडी समाजातील विदयार्थ्‍यांसाठी शालेय व उच्‍च शिक्षणासाठी संधी निर्माण करणे, शैक्षणिक शिष्‍यवृत्‍ती देणे, शैक्षणिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करुन कैकाडी समाजातील नागरीकांचे शैक्षणिक विकास घडविणे साठी काम करणे. नोकरी व उदयोग व्‍यवसाय प्रशिक्षण व प्रबोधनपर कार्यकम आयोजित करणे

आरोग्‍य

कैकाडी समाजातील बहुतांश लोक अत्‍यंत गरीबीमध्‍ये जीवन व्‍यतीत करीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना मानवाच्‍या मुलभूत गरजा अन्‍न, वस्‍त्र , निवारा या पुर्ण करणेसाठी खूप मेहनत करुन पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करतात . समाजातील गरीब गरजू नागरीकांना वैदयकीय सेवा मिळविणेाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यकतेनुयार आरोग्‍य शिबीरे आयोजित करणे , रुग्‍णांच्‍या कौटुबिक परीस्थितीचा विचार करुन आवश्‍यकतेनुसार वैदयकीय मदत निधी मिळवून देणेसाठी काम करणे

कैकाडी समाज संघ व संघटना